नागरिकांना साहित्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:37+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावीमुरांडा येथील जि.प.शाळेच्या मैदानावर जनजागरण मेळावा मंगळवारी घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामस्थांना ताडपत्री तसेच महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना नोटबुकाचेही वाटप करण्यात आले.

Distribution of literature to citizens | नागरिकांना साहित्याचे वितरण

नागरिकांना साहित्याचे वितरण

ठळक मुद्देमेळावा : राणी दुर्गावती बांबू हस्तकला स्पर्धा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मो.) : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावीमुरांडा येथील जि.प.शाळेच्या मैदानावर जनजागरण मेळावा मंगळवारी घेण्यात आला. या मेळाव्यात ग्रामस्थांना ताडपत्री तसेच महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना नोटबुकाचेही वाटप करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, नायब तहसीलदार सुरेंद्र दुधबळे, सहायक आरटीओ चंद्रशेखर वाघमारे, प्रा.अंबादास धनविजय, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी उमेश चिकने, पावीमुरांडाचे सरपंच भाऊराव कुमरे, माजी उपसरपंच रवींद्र कुळमेथे, शिवाणी आश्रमशाळेचे प्राचार्य देवेंद्र डांगे, विनोद बोरकर आदीसह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व गाव पाटील उपस्थित होते.
उपविभागीयस्तरावर राणी दुर्गावती बांबू हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चापलवाडा येथील रेखा चौधरी यांनी प्रथम, माडेआमगच्या मनीषा मडावी यांनी द्वितीय तर तळोधी (मो.) येथील रहिवासी कुसूम मडावी आणि गडचिरोलीच्या सुनीता गोमलवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रथम विजेत्याला रोख सहा हजार, द्वितीय विजेत्यास चार हजार व तृतीय विजेत्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर मेळाव्यात मुतनूर, ढेकणी, पुसेर या गावातील नागरिकांना ३० बाय ४० च्या आकाराची प्रत्येकी एक ताडपत्री वितरित करण्यात आली. बावणचुवा व इतर चार गावातील एकूण ५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना ७० नोटबुक तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना ३० नोटबुकांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी मुम्मका सुदर्शन म्हणाले, पावीमुरांडा व तळोधी (मो.) परिसरातील कुणीही व्यक्ती नक्षलवाद्यांसाठी काम करणार नाही. युवक नक्षल चळवळीत भरती होणार नाही. वाट चुकलेल्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे सांगितले.


विविध विभागाच्या योजना व उपक्रमांबाबत जनजागृती
सदर जनजागरण मेळाव्यात चामोर्शी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पशुवैद्यकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग व इतर विभागाच्या वतीने स्टॉल लावून शासकीय योजना व नागरिकांसाठी असलेल्या विविध उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली. पशुपालकांसाठी असलेले विविध योजना, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विहीर, बी-बियाणे, यांत्रिकीकरण आदी योजनांची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. या योजनेसाठी लागणारे दस्तावेज गोळा करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टॉलवरील अधिकारी व कर्मचाºयांनी केले. संचालन उद्भान जांभूळकर यांनी केले.

Web Title: Distribution of literature to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.