धानोऱ्यात ६७ शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:41+5:302021-07-23T04:22:41+5:30

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिंगला यांनी सामूहिक वनहक्कांचे अधिकार मिळालेले लेखा मेंढा हे धानोरा तालुक्यातील गाव देशातील पहिले गाव असून, ...

Distribution of forest belts to 67 farmers in Dhanora | धानोऱ्यात ६७ शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वाटप

धानोऱ्यात ६७ शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वाटप

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिंगला यांनी सामूहिक वनहक्कांचे अधिकार मिळालेले लेखा मेंढा हे धानोरा तालुक्यातील गाव देशातील पहिले गाव असून, हे या तालुक्याचे भूषण असल्याचे ते म्हणाले. या तालुक्यातील शेतकऱ्यांना माझ्या हस्ते जमिनीचे पट्टे वाटप होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी तालुक्यातील सावरगाव येथे ९, बोदिन येथे १८, गोडलवाही १३, रेचे ३, कामनगड ४, कुलभट्टी ८, कनगडी १०, पेंढारी १, गायडोंगरी १ असे एकूण ६७ वनपट्टे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत पाच विधवा महिला लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन वनीश्याम येरमे यांनी, तर आभार नायब तहसीलदार धनराज वाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार दामोदर भगत, पुरवठा निरीक्षक चंदू प्रधान, कविता नायडू, सोनाली कांकलवार व तलाठी यांनी सहकार्य केले.

(बॉक्स)

..हा तर जमिनीचा सातबाराच

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिंगला म्हणाले, हा फक्त पट्टाच नसून त्या जमिनीचा सातबाराच आहे, हे वनपट्टे प्रशासन आणि सरकारच्या प्रयत्नाअंती मिळाले आहे. तुम्ही इतके वर्ष करत असलेला मेहनतीचे हे फळ आहे. याचे चांगले जतन करून ठेवा. तसेच सन २००५ पूर्वी जे शेतकरी वनजमिनीवर शेती करीत असतील, अशांनी सर्व पुरावे गोळा करून तहसीलदार, एसडीओ यांच्यामार्फत माझ्याकडे पाठवा. मी आपल्याला आपले हक्क मिळवून देईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

220721\img_20210722_113823_958.jpg

वनपट्टे वाटप करतांना जिल्हाधिकारी

Web Title: Distribution of forest belts to 67 farmers in Dhanora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.