सीआरपीएफतर्फे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
By Admin | Updated: May 11, 2014 00:20 IST2014-05-11T00:20:59+5:302014-05-11T00:20:59+5:30
स्थानिक सीआरपीएफच्या ११३ बटालियनतर्फे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत मुरूमगाव परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले

सीआरपीएफतर्फे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
मुरुमगाव : स्थानिक सीआरपीएफच्या ११३ बटालियनतर्फे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमाअंतर्गत मुरूमगाव परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले. सीआरपीएफच्यावतीने २३ एप्रिल ते ७ मे दरम्यान पोलीस मदत केंद्र मुरूमगाव येथे नागरिकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट एस. एस. एच. रिझवी यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट कमांडंट स्वतंत्रकुमार यांनी परिसरातील सिंदेसूर, गोपीटोला, पोयाटोला, गुटालहूर, टोवीटोला, मुरूमगाव, मरारटोला, वड्डेटोला, आमपायली, गुर्रेकसा, रेडवाही, पन्नेमारा, बेलगाव, खेडेगाव, रेंगेगाव, रामपूर, मसाद, केहेकावाही आदी गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात शिलाई मशिन, पाण्याचे ड्रम, जर्मनी गंज, ब्लाँकेट, साडी, मच्छरदाणी, रेडिओ, सौरदिवे आदी वस्तूंचा समावेश होता तर शालेय विद्यार्थ्यांसाठी व युवकांसाठी खेळाचे साहित्य, बॅडमिंटन, रॉकेट नेट, व्हॉलीबॉल स्पोर्ट कीट, क्रिकेट कीट, स्किपींग रोप आदी क्रीडा साहित्यांचा समावेश होता. या बरोबरच विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, टिफिन बॉक्स, नोटबुक, ड्रार्इंग बुक, स्केच पेन, स्केलपट्टी आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षणाच्या सक्तीने ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक विकास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या अधिकाराप्रती जागरूक होऊन शिक्षण घेण्यास पाल्यांना प्रवृत्त करावे, असे प्रतिपादन असिस्टंट कमांडंट स्वतंत्रकुमार यांनी केले. यावेळी पीएसआय सुबहसिंग, आर. झगडे, मेघवाल, जगदीशन, क्रिष्णारेड्डी, मांडवे, स्वप्नील लोखंडे, निरांजन रणवरे, सचिन गढवे,स्वप्नील नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)