जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:53 IST2018-11-03T23:53:13+5:302018-11-03T23:53:51+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथील वनविभागाच्या सभागृहात जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने भामरागड येथील वनविभागाच्या सभागृहात जनजागरण मेळावा व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय बन्सल, तहसीलदार कैलास अंडील, संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवडचे संस्थापक डॉ.मोहन गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गे, नगराध्यक्ष घाडगे, गटशिक्षणाधिकारी अश्विन सोनवने, नगरसेविका बासंती मडावी, भारती इष्टाम, सब्बर बेग मोगल, पोलीस निरीक्षक सुरेश मदने उपस्थित होते. डॉ.मोहन गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी सहा हजार कपड्यांचे वाटप नागरिकांना केले. त्यामध्ये साड्या, पुरूष व मुलांचे कपडे आदींचा समावेश होता. ५१ गर्भवती स्त्रीयांना प्रोटीन आहाराचे तसेच लहान मुलांना खाऊ व दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. दरम्यान लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागपूरच्या मंत्री संघटनेचे सुहास खरे, आशिष नाकपुरे, मनोज गावडे यांनी औषधीचे वाटप केले. नागरिकांना नक्षलवाद्यांपासून होणाऱ्या नुकसानीची माहिती देऊन त्यांना नक्षलविरोधी प्रतिज्ञा देण्यात आली. संचालन पीएसआय ज्ञानेश्वर झोल यांनी केले.