संघटनेची सभा : अहवालवाचनासह विविध मुद्दे मांडले;देणगीदात्यांचा केला सत्कारगडचिरोली : ज्येष्ठ नागरिक संस्था गडचिरोलीची सभा रविवारी जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात संस्थाध्यक्ष डी. एन. बर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करून देणगीदात्यांचा सत्कार करण्यात आला. सभेला उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव डी. डी. सोनटक्के, कोषाध्यक्ष डी. एच. गेडाम, सहसचिव बी. बी. होकम, सल्लागार सी. बी. आवळे, सदस्य जे. व्ही. उमडवार, विश्वनाथ भिवापुरे, पी. एल. एडलावार, जे. एच. ब्राम्हणवाडे, डी. जी. वडेट्टीवार, सोरते, रेकचंद राऊत उपस्थित होते. या सभेत चालूवर्षातील दिवंगत संस्थेचे सदस्य गजानन निखारे, पांडुरंग पिपरे, तुळशीराम राऊत, भाऊराव कुमरे, विठ्ठल घागी, विद्यादास वाळके, बाबाराव झापे, सुरेश डोंगरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवालवाचन सोनटक्के यांनी केले. खुशाल वाघरे, शंकर काळे, अॅड. मधुकर गुड्डेवार, दादाराव चुधरी, विलास माधमशेट्टीवार यांनी अनेक सूचना केल्या. माजी सचिव गंगाधर म्हस्के यांनी चौकशी समितीचा अहवाल सभेत वाचून दाखविला. संस्थेचे कार्यकारी मंडळ ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची जनजागृती करणे, ज्येष्ठ नागरिक भवन, विरंगुळा केंद्र निर्मितीसाठी शासन व लोकप्रतिनिधींकडे सतत पाठपुरावा करणे यासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक सदस्यांनी सहचारिणीला सोबत घेऊन संस्थेचे सदस्यत्त्व स्वीकारावे, असे आवाहन सोनटक्के यांनी केले. संस्थेला देणगी दिल्याबद्दल तुकाराम चन्नावार, बी. एन. बर्लावार यांचा सी. बी. आवळे व घोटेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आभार डी. एच. गेडाम यांनी मानले.
ज्येष्ठ नागरिकांच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:52 IST