सेवानिवृत्त शिक्षकांची बिडीओसाेबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST2021-03-31T04:36:50+5:302021-03-31T04:36:50+5:30
चर्चेदरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन लागू करून थकबाकी काढण्यात यावी. उपदान व अंशराशीकरण राशी अदा करावी. पी. पी. ...

सेवानिवृत्त शिक्षकांची बिडीओसाेबत चर्चा
चर्चेदरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्तीवेतन लागू करून थकबाकी काढण्यात यावी. उपदान व अंशराशीकरण राशी अदा करावी. पी. पी. ओ. पुस्तिका अद्ययावत कराव्यात. अतिप्रदान वसुली थांबवून वसुली केलेली रक्कम परत करण्यात यावी. मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या पाल्यांना लाभ देण्यात यावा. ८० वर्ष ओलांडलेल्या शिक्षकांच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी. गटविमा व भविष्य निर्वाह निधी लवकरात लवकर अदा करण्यात यावा. आदी विविध मागण्यांवर व प्रलंबित समस्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सदर प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, सहायक प्रशासन अधिकारी संतोष मसराम, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंत राऊत, आनंदराव बावणे, श्रावण रंधये, रघुनाथ राऊत, विजय सहारे, सिंधू उघाडे आदी उपस्थित होते.