दिशादर्शक फलक झाले दिशाहीन
By Admin | Updated: July 9, 2017 02:22 IST2017-07-09T02:22:11+5:302017-07-09T02:22:11+5:30
देसाईगंज-विसोरा-कुरखेडा-कोरची वरून थेट छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या मार्गावरील विसोरा (सिताबर्डी) ते विसोरा

दिशादर्शक फलक झाले दिशाहीन
प्रवाशांमध्ये संभ्रम : वडसा-कुरखेडा मार्गावरील समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज-विसोरा-कुरखेडा-कोरची वरून थेट छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या मार्गावरील विसोरा (सिताबर्डी) ते विसोरा (मूळवस्ती) तसेच शंकरपूर गावापासून २०० मीटर अंतरावरील पुढील वळणावर लावण्यात आलेले दिशादर्शक फलकावरील वळणाची दिशा उलट दाखविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्येही संभ्रम असून त्यांचाही गोंधळ उडत आहे.
विसोरा येथून कुरखेडा-कोरचीकडे राज्य मार्ग जातो. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या वळणावळणावर कडेला वळण दर्शविणारे दिशादर्शक फलक लावण्यात आले. वडसापासून पाच किमी अंतरावरील विसोरादरम्यान तसेच शंकरपूरपासून कुरखेडा मार्गाच्या २०० मीटर अंतरावरील वळणाच्या बाजुला प्रवाशांसाठी वळणाची दिशा दाखविणारे दोन-दोन फलक लावण्यात आले. परंतु वडसाकडून कुरखेडाकडे जाताना मार्गावर दोन्ही वळणाच्या कडेला वळण दाखविणारे दिशादर्शक फलकावरील दिशा वळणाच्या विरूध्द बाजुने दर्शविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ राहत असल्याने चुकीचे दिशादर्शक बोर्ड काढून नवे सुधारीत फलक लावावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.