धानाेरा स्टेट बँकेच्या ग्राहकांना उन्हाचे चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:25+5:302021-03-31T04:37:25+5:30
धानोरा येथे भारतीय स्टेट बँकेची सर्वात जुनी शाखा आहे. या बँकेत तालुक्यातील नागरिक, कर्मचारी, वृद्ध, निराधार, अपंग व्यक्ती तसेच ...

धानाेरा स्टेट बँकेच्या ग्राहकांना उन्हाचे चटके
धानोरा येथे भारतीय स्टेट बँकेची सर्वात जुनी शाखा आहे. या बँकेत तालुक्यातील नागरिक, कर्मचारी, वृद्ध, निराधार, अपंग व्यक्ती तसेच विद्यार्थ्यांची खाती आहेत. असंख्य ग्राहक आपले व्यवहार पार पाडण्याकरिता दूरदूरून येत असतात.
कोरोना संसर्गामुळे शासनाच्या आदेशानुसार मोजक्याच ग्राहकांना आतमध्ये प्रवेश देण्यात येतो. बँकेने कॅश जमा, विड्राॅल तसेच पासबुक प्रिंटिंगकरिता खिडकीमध्ये काऊंटर सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना व्हरांड्यात उभे राहूनच आपले व्यवहार पार पाडावे लागतात. मार्च महिना संपत आला असून, सूर्य आग ओकत आहे. गर्दीमुळे ग्राहकांना तासंतास उभे राहावे लागत आहे. त्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे बाहेर पेंडाॅल व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.