शिक्षणाबरोबरच कलेचा विकास करा

By Admin | Updated: February 4, 2015 23:14 IST2015-02-04T23:14:29+5:302015-02-04T23:14:29+5:30

कला ही मानवाला जीवन जगण्याविषयी शिकविते. कलेच्या माध्यमातूनही करिअर घडविता येते. त्यामुळे प्राध्यापकांनी दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत

Develop art along with education | शिक्षणाबरोबरच कलेचा विकास करा

शिक्षणाबरोबरच कलेचा विकास करा

कुलगुरूंचे प्रतिपादन : तंबाखूविरोधी भित्तीचित्र प्रदर्शन
गडचिरोली : कला ही मानवाला जीवन जगण्याविषयी शिकविते. कलेच्या माध्यमातूनही करिअर घडविता येते. त्यामुळे प्राध्यापकांनी दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले.
स्थानिक महिला महाविद्यालयात स्नेहसंवर्धन दिनाचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौरभ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गौतम, प्राचार्य डॉ. खंगार, प्राचार्य डॉ. हंसा तोमर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. हंसा तोमर यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. जीवनात पुढे जायचे असेल तर श्रम आवश्यक आहे. अडचणींचा सामना केल्याशिवाय जीवन सार्थक होत नाही, असे मौलीक विचार मांडले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या ‘मनोबल’ या विशेषकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तंबाखूविरोधी भित्तीचित्र प्रदर्शनी लावण्यात आली. विद्यार्थ्यांनी तंबाखूचे दूष्परिणाम या भित्तीचित्रांच्या माध्यमातून दर्शविले. तंबाखूमुक्ती ही आजची काळाची गरज असून महाविद्यालयाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिता लोखंडे, प्रा. प्रमोद बोधाने तर आभार प्रा. डॉ. संगीता भुसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Develop art along with education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.