शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:09 IST2018-07-09T00:08:57+5:302018-07-09T00:09:43+5:30
कोरची तालुक्यातील शेतकºयांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात,

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी आमदार कृष्णा गजबे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ४०० च्या वर वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात यावा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर धान बियाणे उपलब्ध करून द्यावे, खताचा पुरवठा नियमित करावा, कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात यावी, खंडीत वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी आदी मागण्यांचा समावेश आहे. काटेंगे यांनी आमदारांशी चर्चा केली. कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार, असे आश्वासन आ. कृष्णा गजबे यांनी सभापती काटेंगे यांना दिले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.