शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

विहीरगावच्या जंगलातील मोहफूल सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM

सिर्सी या ग्रामपंचायतअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (२) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण विहीरगाव, कुकडी, मोहटोला, गणेशपूर (१) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल्या कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावांमध्ये गाव संघटनांनी दारूविक्री बंद केली आहे.

ठळक मुद्देमहिलांची कारवाई । १४ ड्रम व ५ मडकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव नजीकच्या जंगलात लपवून असलेला जवळपास एक लाखाचा मोहफूल सडवा विहीरगावच्या महिलांनी नष्ट केला. या मोहसडव्याचे १४ ड्रम आणि ५ मडके बाहेर काढून नष्ट करण्यात आले.सिर्सी या ग्रामपंचायतअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (२) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण विहीरगाव, कुकडी, मोहटोला, गणेशपूर (१) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल्या कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावांमध्ये गाव संघटनांनी दारूविक्री बंद केली आहे. पण येथील तब्बल १० विक्रेत्यांनी विहीरगावच्या जंगलात दारू गाळण्याचे अड्डे सुरू केले आहेत. येथून आसपासच्या गावांमध्ये नेऊन दारू विकली जात आहे. याचा त्रास विहीरगावच्या लोकांना होतो.काही दिवसांपूर्वी विहीरगाव येथे मुक्तिपथ गाव संघटन पुनर्गठीत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान दामदुप्पट दराने दारूची विक्री करता येते. याचा फायदा उचलण्यासाठी विहीरगाव परिसरातील दारूविक्रेत्यांनी दारू काढण्यास सुरूवात केली. गावाजवळच दारू मिळत असल्याने आणि त्यातच निवडणुकीचे वातावरण असल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या वाढून गावातील शांतता धोक्यात आली होती. गावातील महिलांनी एकत्र येत जंगलात जाऊन दारू अड्डा शोधला. नाल्याजवळ सडवा भरलेले १४ ड्रम व ५ मडके जमिनीत पुरून ठेवले असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण सडवा तसेच दारू गाळण्याचे साहित्य नष्ट केले. ही कारवाई झाल्यामुळे गावात आता दारूमुक्त निवडणूक होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी