दुधबावरे चामोर्शी पं.स.च्या उपसभापती

By Admin | Updated: September 22, 2015 02:45 IST2015-09-22T02:45:28+5:302015-09-22T02:45:28+5:30

स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत

Deputy Chairman of the Chamorshi Pt | दुधबावरे चामोर्शी पं.स.च्या उपसभापती

दुधबावरे चामोर्शी पं.स.च्या उपसभापती

दिगांबर जवादे ल्ल गडचिरोली
जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच पर्यटनस्थळांच्या विकासाबाबतचा विस्तृत आराखडा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास आॅगस्ट महिन्यात सादर केला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळांचा समावेश आहे. त्यापैकी सहा पर्यटनस्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून शासनाकडून निधी प्राप्त होताच या पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे केली जाणार आहेत.
८० टक्के जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक स्थळे आहेत. निसर्गाच्या वातावरणात सदर स्थळे असल्याने या स्थळांचे सौंदर्य इतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या तुलनेत निश्चितच वेगळे आहे. मात्र आजपर्यंत शासनाने पर्यटन विकासासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सदर स्थळांचा विकास होऊ शकला नाही व ही स्थळे दुर्लक्षित राहिली होती.
दोन वर्षांपूर्वी क्रिएटीव्ह सर्कल या संस्थेच्या वतीने जिल्हाभरातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देऊन अभ्यास करण्यात आला. प्रत्येक स्थळावर नेमक्या कोणत्या बाबीची गरज आहे, हे ठरविण्यात आले व याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात गडचिरोली जिल्ह्यातील ४० स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
२० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी रणजितकुमार व जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा सादर करण्यात आला आहे. या आराखड्यात संपूर्ण ४० ही पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची विस्तृत माहिती आराखड्यात सादर करण्यात आली आहे. यातील गडचिरोली, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा, चपराळा देवस्थान, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर व नगरम, भामरागडजवळील त्रिवेणी संगम या सहा स्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. निधी प्राप्त होताच या ठिकाणी विकासाची कामे केली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे यांनी दिली आहे.

आराखड्यात समाविष्ट पर्यटन स्थळे
४गडचिरोलीतील तलाव, आरमोरी तालुक्यातील वैरागडचा किल्ला, गोरजाई मंदिर, आदिशक्ती देवी मंदिर, भद्रेश्वर मंदिर, पाच पांडव, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, कोठारी येथील बुध्दस्तूप, तुमडी येथील नारायण सेवाश्रम, संत जगन्नाथ महाराज धर्मशाळा मार्र्कंडा, कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथील महादेव मंदिर, अरततोंडी येथील महादेवगड, देसाईगंज तालुक्यातील आमगाव बुटी येथील राम मंदिर, कुरूड गाव, मुलचेरा तालुक्यातील हनुमान मंदिर, चपराळा येथील प्रशांतधाम, अभयारण्य, कोरची तालुक्यातील कुमकोटी येथील राजमाता मंदिर, हनुमान मंदिर, खोब्रामेंढा, टिप्पागड, अहेरी तालुक्यातील सत्यदेवी, पाच पांडव मंदिर, लख्खामेंढा, प्राणहिता-बमर संगम, बमर-हितामार संगम, बमर मादाराम संगम, लगाम डॅम, भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्प, भामरागड संगम, बिनागुंडा धबधबा, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पेठा, धानोरा तालुक्यातील झाडापापडा येथील कुंवरदेव मंदिर, सिरोंचा तालुक्यातील सोमनूर, नगरम, हजरत अली हैदरशहा बाबा दर्गा, आलापल्ली येथील फॉरेस्ट विभाग नागदेवता, पातानिल, व्यंकटापूर, कुनकुडम टेकडी या ४० पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

पर्यटनस्थळी या सुविधा राहणार
४नदी घाटाचा विकास केला जाणार आहे. या ठिकाणी बोट, बगिचा, सुरक्षिततेची साधने, लाईफ गार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर शुध्द पाण्याची व्यवस्था, शौचालय, हॉटेल आदी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

चार टप्प्यात होणार विकास
४आराखड्यात नमूद ४० ही पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी शेकडो कोटी रूपयांची गरज आहे. एवढा मोठा निधी शासन एकाच वेळीच उपलब्ध करून देऊ शकत नाही. यासाठी चार टप्प्यात या स्थळांचा विकास करण्याचे ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १५ पर्यटनस्थळे राहणार आहेत. यातील सहा पर्यटनस्थळांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. या स्थळांचा विकास पाच वर्षांच्या आत केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. दुसरा टप्पा पुढचे पाच ते दहा वर्षांत राबविला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात १० व चौथ्या टप्प्यात उर्वरित स्थळांचा विकास केला जाणार आहे.

पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने गडचिरोली-मार्र्कंडा-चपराळा-सिरोंचा-सोमनूर-भामरागड असा सर्कीट तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास झाल्यानंतर याची माहिती ताडोबासह इतर महत्त्वाच्या व जवळच्या पर्यटनस्थळावर ठेवण्यात येईल. ही माहिती बघून पर्यटक किमान एका दिवसासाठी तरी गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यास तयार होतील. त्याचदृष्टीने सर्कीट तयार करण्यात आले आहे.
- रणजितकुमार,
जिल्हाधिकारी, गडचिरोली

जिल्ह्यात पर्यटनाला चांगला वाव आहे. शासनाकडे पर्यटनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच विकासकामांना सुरूवात होईल. किमान ३० ते ३५ कोटींचा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- धनंजय सुटे,
जिल्हा नियोजन अधिकारी, गडचिरोली

Web Title: Deputy Chairman of the Chamorshi Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.