वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची चाैकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:49+5:302021-03-18T04:36:49+5:30
सिरोंचा तालुक्यातील वाल्मिकी मत्स्यव्यवसाय संस्थेने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या कालावधीत प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आल्याने संस्थेच्या सभासदांचे ...

वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची चाैकशी करण्याची मागणी
सिरोंचा तालुक्यातील वाल्मिकी मत्स्यव्यवसाय संस्थेने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० या कालावधीत प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आल्याने संस्थेच्या सभासदांचे ३० डोंगे, मच्छी पकडण्याची जाळी वाहून गेली. त्यामुळे सभासदांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दाखवून शासनाकडून अनुदान प्राप्त केले होते. परंतु, रंगुवार यांच्या म्हणण्यानुसार, नमूद केलेले काही लाभार्थी हे मच्छीमार व्यवसाय करीत नाहीत तर काहींकडे डोंगासुध्दा नाही. सदर लाभार्थी हे शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र नसतानाही संस्थाध्यक्षांनी शासनाकडे बनावट प्रस्ताव पाठवून नुकसान भरपाईपोटी लाखो रुपयांचे अनुदान हडप केले, असा आरोपही बापू रंगूवार यांनी केला आहे. संस्थेमार्फत ९५ सभासदांचे नुकसान झाल्याची शिफारस शासनाकडे केली होती. वाहून गेलेल्या डोंग्यांचा पंचनामासुद्धा करण्यात आला नाही. मत्स्यव्यवसाय संस्था, गडचिरोली यांनीदेखील पुराव्याबाबतीत तसेच वाहून गेलेल्या डोग्यांबाबत पंचनाम्यासाठी तहसीलदारांकडे कुठलाही पाठपुरावा व पत्रव्यवहार केला नाही. ३० पैकी २० व्यक्तींकडे डोंगा उपलब्ध नाही. मग डोंगा वाहून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसे झाल्यास त्याबाबतीत सविस्तर चौकशी करावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्याबाबत मोका पंचनाम्याचा अहवाल तहसील कार्यालयात उपलब्ध नाही. संस्थाध्यक्षांनी शासन व प्रशासनाची दिशाभूल करुन लाभार्थिंच्या नावाने नुकसानभरपाई मिळवीत रक्कम उचल करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी रंगुवार यांनी केली आहे.