गडचिरोली शहरासाठी १३८ कोटींच्या निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:32 IST2019-02-21T23:31:32+5:302019-02-21T23:32:18+5:30
शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ठेवलेल्या जागांचे हस्तांतरण करणे,

गडचिरोली शहरासाठी १३८ कोटींच्या निधीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरात विविध विकास कामे करण्यासाठी १३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून सर्व्हिस रोड तयार करणे व राखीव ठेवलेल्या जागांचे हस्तांतरण करणे, मार्ग बांधणे यासाठी ५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गडचिरोली शहराचा विस्तार वाढला आहे. विस्तारलेल्या शहरात नवीन पाईपलाईन टाकणे, पाणी टाक्यांचे झोनिंग तयार करणे यासाठी ४३ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविण्यात आले आहे.
शहराचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देण्याकरिता ४ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. नगर पालिकेचे स्वतंत्र प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, लांझेडा परिसरातील तलावामध्ये बगिचासाठी पाच कोटी रुपये, वातानुकुलित नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांसोबत चर्चा केली. गडचिरोली शहराला यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नव्याने मागितला जाणारा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.