गोडलवाही-पेंढरी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:38 IST2021-04-09T04:38:11+5:302021-04-09T04:38:11+5:30

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या ...

Demand for repair of Godalwahi-Pendhari road | गोडलवाही-पेंढरी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी

गोडलवाही-पेंढरी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी

धानोरा : तालुक्यातील गोडलवाही, महागाव, पेंढरी मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्के खावे लागत आहेत. महामंडळाची बसही या मार्गावरून कशीबशी धावत आहे. सातत्याने मागणी करूनही या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्ती केली नाही. या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासनाच्या नियोजन शून्यतेमुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येथे अपघाताची शक्यता वाढली आहे. सदर मार्ग रहदारीचा असून येथून दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. हा भाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. त्यामुळे वेळीच दुरूस्ती अथवा रस्त्याचे नूतनीकरण केले जात नाही.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली. यापूर्वी परिसरातील काही गावांमध्ये तेंदू हंगामात आवागमन वाढले होते. आधीच हाल झालेल्या रस्त्याच्या दुरवस्थेत आणखी भर पडली आहे. या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.

Web Title: Demand for repair of Godalwahi-Pendhari road