लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा येथील साई भजन मंडळाच्या वृद्ध कलावंतांनी रविवारी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कांकडलवार यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात भेट घेऊन वृद्ध कलावंतांना शासना कडील मानधन मिळवून देण्यासाठी योग्य सहकार्य करण्याची मागणी केली.वृद्ध कलावंत मेडी चंद्रय्या, बापू बंदेला, लक्ष्मण दुंपला, दुर्गय्या तलारी, गंगुलु येल्लेला, पर्सा बालकीष्टु, मदेशी पोचम, गंदम पोचम, येरोला किष्टय्या, तोकला राजान्ना, गरपट्टी पोचन्ना, आदींनी भेट घेऊन आपली मानधनाची समस्या मांडली. माजी आमदार दीपक आत्राम व जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वृद्ध कलावंताना योग्य सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी जि.प. सदस्य अनिता आत्राम, जि. प. सभापती जयसुधा जनगाम, पं.स. सदस्य शकुंतला जोडे, मंदा शंकर, आकुला मल्लिकार्जुनराव, बानय्या जनगाम, रवी सल्लमवार, तिरुपती कोंडागोरला, मारोती गणपुरापु, श्याम बेज्जनीवार, कुम्मरी सडवली, किरण वेमुला, चौधरी समय्या, लक्ष्मण गावडे व आविसचे कार्यकर्ते हजर होते.
मानधन मिळवून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:33 IST
सिरोंचा येथील साई भजन मंडळाच्या वृद्ध कलावंतांनी रविवारी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कांकडलवार यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात....
मानधन मिळवून देण्याची मागणी
ठळक मुद्देवृध्द कलावंताचे शिष्टमंडळ भेटले : आत्राम यांच्याशी चर्चा