बारा बलुतेदारांना आर्थिक मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:47+5:302021-04-28T04:39:47+5:30
याबाबत तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, तालुका अध्यक्ष ...

बारा बलुतेदारांना आर्थिक मदत देण्याची मागणी
याबाबत तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, तालुका अध्यक्ष संजय खेडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ५ एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आले. सध्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता उर्वरित दुकाने बंद आहेत. त्यातच जिल्ह्यातील बारा बलुतेदार आपला परंपरागत व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, लॉकडाऊन असल्याने बारा बारा बलुतेदारांची दुकाने बंद आहेत. बारा बलुतेदारांचे जीवनमान सर्वस्वी व्यवसायावर अवलंबून आहे . त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बारा बलुतेदारांना प्रत्येकी किमान ५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची गरज आहे. गतवर्षीसुद्धा या बारा बलुतेदारांना लॉकडाऊनचा फटका सहन करावा लागला परत दुसऱ्या वर्षीही त्यांना लॉकडाऊनला सामोरे जात जीवन जगावे लागते आहे. त्यामुळे बारा बलुतेदारांच्या आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी करावी व त्यांच्या कुटुंबाची होणारी परवड थांबवावी, तसेच प्रत्येक तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या कोरोना सेंटरमधून रुग्णांना ऑक्सिजनसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.