मुतनूर देवस्थानात सुविधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:46+5:30
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु आवश्यक प्रमाणात या धार्मिक स्थळाचा विकास झाला नाही.

मुतनूर देवस्थानात सुविधांची मागणी
न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथून सहा किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या तुमनूर देवस्थानात दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त यात्रा भरते. तुमनूर देवस्थानात भाविकांची गर्दी उसळत असल्याने या धार्मिक स्थळाचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. परंतु या मागणीकडे शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु आवश्यक प्रमाणात या धार्मिक स्थळाचा विकास झाला नाही. देवस्थानात गणेश मंदिर, हनुमान मूर्ती, दुर्गा मंदिर व पहाडीवर शंकर-पार्वती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. निसर्गरम्य वातावरणात पहाडांनी नटलेल्या घनदाट जंगलात असलेल्या देवस्थानला अनेक पर्यटक भेटी देतात. निसर्गरम्य वातावरणामुळे हे धार्मिक स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. वर्षभर भाविक दर्शनासाठी देवस्थानस्थळी येत असतात.
दरवर्षी गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरत असल्याने दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मुतनूर देवस्थानचा विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून विकासाबाबत हालचाली नाही.