पोलिसांच्या श्रमदानातून तलावाचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:27+5:30

एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील गाव तलावात कित्येक वर्षापासून मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गाव तलावाचे खोलीकरण केले. पोकलॅन्ड, जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपसा करून तलावाचे खोलीकरण करण्यात आले.

Deepening of the lake through police labor | पोलिसांच्या श्रमदानातून तलावाचे खोलीकरण

पोलिसांच्या श्रमदानातून तलावाचे खोलीकरण

ठळक मुद्देपरसलगोंदीच्या तलावाचे रूप पालटले : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा, मत्स्य शेतीतून मिळणार स्थानिकांना रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी नावीण्यपूर्ण योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून हेडरी उपविभागाअंतर्गत आलदंडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील परसलगोंदी येथील गावतलावाचे श्रमदानातून खोलीकरण करण्यात आले. आता या तलावाचे रूप पालटले असून सिंचन सुविधा निर्माण होणार आहे.
एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील गाव तलावात कित्येक वर्षापासून मोठ्याप्रमाणात गाळ साचल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर गाव तलावाचे खोलीकरण केले. पोकलॅन्ड, जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपसा करून तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तलावातील मुरूम गावातील अंतर्गत मार्गावर टाकून रस्ता दुरूस्तीचे काम करण्यात आले. तसेच तलावातील गाळ शेतक्यांच्या शेतामध्ये टाकल्यामुळे शेती उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
सदर तलावात पावसाचे पाणी साचल्यानंतर गडचिरोली पोलीस दलातर्फे स्थानिक बांधवांना मत्स्यबिज उपलब्ध करून दिले जाणार आहे. मत्स्य शेतीच्या माध्यमातून या भागातील अनेक तरूणांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.
तलाव खोलीकरण उपक्रमासाठी एसडीपीओ संकेत गोसावी यांच्या नेतृत्वात सीआरपीएफ १११ बटालियनचे पोलीस निरीक्षक ठाकरे, हेडरीचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संदेश नाळे, अमित पाटील, अजित मोरे, विनायक माहुरकर, सोपान मुंडे, महेश सातपुते, किरण मगदूम, गोपाल इंद्राळे, राहुल वानखेडे व कर्मचाºयांनी सहकार्य केले.

पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात राबविणार उपक्रम
एटापल्ली तालुक्याच्या परसलगोंदी येथील तलावाचे पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी श्रमदानातून तसेच यंत्राच्या सहाय्याने खोलीकरण केले. त्यामुळे मत्स्य शेती व सिंचन सुविधेला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील बºयाच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. सदर उपक्रम हा जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे.

Web Title: Deepening of the lake through police labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस