कटेझरीत नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:47+5:302021-03-29T04:22:47+5:30

धानोरा : तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायत येथील कटेझरी येथे २७ मार्च राेजी नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर ...

Dedication of new Anganwadi building at Katzari | कटेझरीत नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

कटेझरीत नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण

धानोरा : तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायत येथील कटेझरी येथे २७ मार्च राेजी नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते करण्यात आले.

कटेझरी येथील अंगणवाडी पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे तेथील महिला व लहान बालकांना त्रास सहन करावा लागत होता. त्याकरिता अंगणवाडीची अवस्था बघता, स्थानिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येवून तेथील अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आले. यावेळी कटेझरी गावातील इतर समस्यांबद्दल नागरिकांनी मनोहर पोरेटी यांच्याशी चर्चा केली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजू जीवानी, विनोद लेनगुरे, सरपंच गोपाल उईके, उपसरपंच भूमिकाबाई धुळसे, संजय गावडे, सदस्य राजू ठाकरे, माणिकचंद कोवे, रोशन बावणे, अनुसया मते, मारोतराव बावणे, पुंडलिक धुळसे, कृष्णाजी कुमरे, दिवाकर धुळसे, उमाकांत धुळसे, पंढरी धुळसे, उमाकांत धुळसे, कवडू धंदरे व गावातील महिला, पुरुष व बालगोपाल उपस्थित होते.

Web Title: Dedication of new Anganwadi building at Katzari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.