शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

गडचिराेली : आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्राेत्साहनात्मक सवलती दिल्या जातात. या सवलतींचे पुनर्विलाेकन करताना कर्मचारी ...

गडचिराेली : आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्राेत्साहनात्मक सवलती दिल्या जातात. या सवलतींचे पुनर्विलाेकन करताना कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा विचार करून शासन निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जि. प. कर्मचारी महासंघ व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीसाठी ना. शिंदे आले असता, संघटनांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. यावर शिंदे यांनी सवलतींचे पुनर्विलाेकन करताना जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हा कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील चडगुलवार, समन्वय समितीचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दुधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर मेश्राम, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लतिफ पठाण, सरचिटणीस किशोर सोनटक्के, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, औषध निर्माता संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक मुन उपस्थित होते.