शाळा शुल्क कमी करण्यासाठी ठाेस धाेरण ठरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:35+5:302021-03-13T05:05:35+5:30
या वर्षीची अकल्पित स्थिती पाहता बहुतेक सर्व शाळांची फी रक्कम किमान ५० टक्के कमी करणे अपेक्षित आहे. सेवा कमतरता ...

शाळा शुल्क कमी करण्यासाठी ठाेस धाेरण ठरवा
या वर्षीची अकल्पित स्थिती पाहता बहुतेक सर्व शाळांची फी रक्कम किमान ५० टक्के कमी करणे अपेक्षित आहे. सेवा कमतरता त्रुटीबाबत प्रत्यक्ष शाळेतील खर्चाशी शुल्काची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. अजूनही कोविड-१९ महामारी, लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योग, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात आले आहेत. अनेक शाळा बंद आहेत; परंतु फी भरण्यासाठी सर्वांवर सक्ती होत आहे. पाल्यांना शाळा सुरू झाल्यावर शिक्षक त्रास देतील या भीतीमुळे हतबल झाल्याने आवाज उठवू शकत नाहीत; परंतु या काळात लाखो पालकांना तातडीचा दिलासा देणे गरजेचे आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारने कोरोना काळात खासगी शाळांना फी वाढू दिलीच नाही. उलट त्यांना शैक्षणिक फी मध्ये सूट देणे भाग पाडले. या धर्तीवर महाराष्ट्रात शासनाने पावले उचलत लॉकडाऊन काळातील शाळा फी नियंत्रणासाठी तातडीचा अध्यादेश काढण्याची मागणी आम आदमी पार्टी व संलग्न पालक संघटनांनी केली आहे. निवेदन देतेवेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, सुरेश गेडाम, रूपेश सावसाकडे, देवेंद्र मुनघाटे, अनिल बाळेकरमकर, दिनेश आकरे उपस्थित हाेते.