देचलीपेठा आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’

By Admin | Updated: February 4, 2015 23:13 IST2015-02-04T23:13:37+5:302015-02-04T23:13:37+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह माध्यमिक, प्राथमिक तसेच अधीक्षकांचे व प्रयोगशाळा परिचराचे पद रिक्त आहे.

Dechalipetha Ashramshala 'Education Income' | देचलीपेठा आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’

देचलीपेठा आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’

मुख्याध्यापकांसह शिक्षकांचे पदे रिक्त : आश्रमशाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा इशारा
देचलीपेठा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह माध्यमिक, प्राथमिक तसेच अधीक्षकांचे व प्रयोगशाळा परिचराचे पद रिक्त आहे. शिक्षकांअभावी या आश्रशाळेत केवळ गणित व मराठी विषयाचेच अध्यापन सुरू असून अन्य विषयाच्या अध्यापनाला बगल देण्यात आली आहे. या आश्रमशाळेत अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने या आश्रमशाळेत ‘शिक्षणाचा आयचा घो’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
देचलीपेठा आश्रमशाळेत इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. १ ते १० वी या वर्गात एकूण ३५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचे पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. प्राथमिक शिक्षकांचे एक व पदवीधर शिक्षकांचे एक पद रिक्त आहे. माध्यमिक शिक्षकांचे तीन पद रिक्त असून महिला व पुरूष दोन्ही अधीक्षकांचे पद रिक्त आहे. त्यामुळे अधीक्षकांचा प्रभार प्राथमिक शिक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. प्रयोगशाळा परिचराचे पदही रिक्त आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विचारणा केली असता, केवळ गणित व मराठी विषयाचे अध्यापन सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थी पटसंख्येनुसार या आश्रमशाळेत पुरेसे स्वच्छतागृह व शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज सुविधेसाठी असलेले विद्युत जनित्र नादुरूस्त असून शोभेची वस्तू बनली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित पालक सभेत पालकांनी आश्रमशाळेतील समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. देचलीपेठा आश्रमशाळेतील रिक्त पदे न भरल्यास आश्रमशाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Dechalipetha Ashramshala 'Education Income'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.