अपघातात महिला कर्मचाºयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:05 IST2017-08-21T23:05:15+5:302017-08-21T23:05:34+5:30
तहसील कार्यालय आरमोरी येथे अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या कमू दिनेश तायडे (३३) या महिला कर्मचाºयाचा पोर्लानजीक दुचाकीच्या अपघातात....

अपघातात महिला कर्मचाºयाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तहसील कार्यालय आरमोरी येथे अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या कमू दिनेश तायडे (३३) या महिला कर्मचाºयाचा पोर्लानजीक दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली.
कमू तायडे या गडचिरोलीवरून आरमोरी येथे कर्तव्यावर रूजू होण्यासाठी दुचाकीने येत होत्या. पोर्ला गावाजवळ अचानक डुक्कर आडवा आला. त्यामुळे दुचाकीसह त्या डांबरी रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तत्काळ गडचिरोली येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. कुमू तायडे याआररमोरी तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत होत्या.