अहेरीच्या पोलीस उपमुख्यालयातील एएसआयचा मृत्यू; बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:27 IST2020-06-02T14:26:42+5:302020-06-02T14:27:01+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अहेरीच्या पोलीस उपमुख्यालयातील एएसआयचा मृत्यू; बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले
गडचिरोली: गडचिरोली येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील बिनतारी संदेश विभागात रेडिओ मेकॅनिक म्हणून कार्यरत असलेले एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) प्रवीण चोंडकाळे यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये मिळाला.अहेरी येथील छोटा बस स्टँड परिसरात एका घरी ते किरायाने राहात होते. नित्यनेमाप्रमाणे त्यांना जेवणाचा डबा देणाऱ्या युवकाला ते बाथरूम मध्ये पडलेले दिसले.
उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी पाहणी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मूळचे अमरावती जिल्ह्यातील असलेले चोंडकाळे यांचे भंडारा येथे घर असून त्यांना पत्नी व दोन मुले आहेत.