शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जीवंत महिलेचे डेथक्लेम उचलणारा मोकाटच

By admin | Updated: October 10, 2016 00:57 IST

जीवंत महिलेला मृत दाखवून तिच्या नावाने असलेली एलआयसीची रक्कम हडप करणारा आरोपी मोकाटच आहे. त्याला अटक करावी,

पत्रकार परिषद : गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्षआष्टी : जीवंत महिलेला मृत दाखवून तिच्या नावाने असलेली एलआयसीची रक्कम हडप करणारा आरोपी मोकाटच आहे. त्याला अटक करावी, अशी मागणी पीडित महिला व तिच्या मुलाने रविवारी पत्रकार परिषदेत केली आहे.राळापेठ येथील साधना किसन पिंपळशेंडे हिने गावातीलच विमा प्रतिनिधी कृष्णा पवित मंडल हिच्यामार्फतीने विमा काढला होता. मात्र या पॉलिसिमध्ये विशेष फायदा मिळत नसल्याने पॉलिसी विड्रॉल करण्यास सांगितले. प्रतिनिधीच्या सांगण्यानुसार साधना पिंपळशेंडे यांनी पॉलिसीचा बॉन्ड पेपर व भरलेल्या पावत्या प्रतिनिधीकडे दिल्या. एका महिन्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही रक्कम जमा झाली नाही. एलआयसी कार्यालय गडचिरोली येथे विचारणा केली असता, डेथक्लेम देण्यात आल्याचे सांगितले. प्रतिनिधी मंडल यांनी बनावट दाखले जोडून पॉलिसीचे ३ लाख ३२ हजार रूपयांच्या रकमेची उचल केली आहे. सदर प्रकरण गडचिरोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र अजूूनपर्यंत प्रतिनिधीला अटक करण्यात आली नाही, प्रतिनिधीला अटक करून आपली रक्कम परत करावी, अशी मागणी साधना पिंपळशेंडे व अक्षय पिंपळशेंडे यांनी दिली आहे.