शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वैनगंगेच्या पुलावरील लोखंडी कठड्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST

वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, मनसे, शिवसेना आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपुलाजवळ बेमुदत   धरणे आंदोलनाला सुरुवात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नागपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून राहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे २०२० मध्ये ऑगस्ट महिन्याच्या महापुरात वाहून गेले. आता दीड वर्षाचा कालावधी लोटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ते कठडे पुन्हा लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे धोकादायक झालेल्या या पुलावरील कठडे पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार (दि.२) पासून पुलाजवळच धरणे आंदोलन सुरू केले.  वास्तविक वर्दळीच्या मार्गावरील हा पूल कठड्यांअभावी प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. कठड्याची दुरुस्ती करावी किंवा नवीन कठडे लावावे यासाठी वारंवार निवेदने देऊनसुद्धा पुलाला संरक्षक कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे २ फेब्रुवारीला प्रहार, युवारंग, माकपा, मनसे, शिवसेना आणि वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपुलाजवळ बेमुदत   धरणे आंदोलनाला सुरुवात केली.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित बनकर, युवारंगचे अध्यक्ष राहुल जुआरे, प्रहारचे सेवक निखिल धार्मिक, माकपाचे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, युवारंगचे उपाध्यक्ष मनोज गेडाम, शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे, सचिव दीपक सोनकुसरे, अंकुश गाढवे, युवारंगचे नेपचंद्र पेलणे, संघटक सूरज पडोळे, प्रशांत सोरते, करण गरमळे, जियाऊल पठाण, मनसेचे आशुतोष गिरडकर, किशोर जंवजाळकर उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची महामार्ग प्राधिकरणकडून अवहेलना

-   ऑगस्ट २०२०च्या महापुरात वाहून गेलेल्या या पुलावरील लोखंडी कठड्यांची दुरुस्ती करण्यासाठी युवारंग क्लबने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षभरापूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी संबंधित विभागाला १९ जानेवारी २०२१ ला पत्र देऊन लोखंडी कठडे लावण्याच्या  सूचना दिल्या होत्या. मात्र महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची सूचनाही पाळली नाही. कठड्यांची दुरुस्ती न झाल्याने नदीच्या पुलावर अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला काेण जबाबदार राहणार?

अपघातानंतरच जाग येईल का?-    वैनगंगा नदीपुलावरून प्रवास करताना नागरिकांना व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. जोपर्यंत पुलावर मोठा अपघात होऊन जीवितहानी होणार नाही, तोपर्यंत काहीच करणार नाही, असा निश्चय संबंधित विभागाने केला आहे का? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला आहे? जोपर्यंत पुलाला लोखंडी कठडे लावण्यात येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या आंदोलकांनी सांगितले.

 

टॅग्स :agitationआंदोलन