जीवनगट्टा येथे सिलिंडरचा भडका

By Admin | Updated: August 3, 2014 00:05 IST2014-08-03T00:05:23+5:302014-08-03T00:05:23+5:30

स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद करून गृहिणी दुसऱ्या खोलीत गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २ किमी

Cylinder split at Vit Gatta | जीवनगट्टा येथे सिलिंडरचा भडका

जीवनगट्टा येथे सिलिंडरचा भडका

जीवितहानी टळली : घरातील सामान जळाले
एटापल्ली : स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद करून गृहिणी दुसऱ्या खोलीत गेली असता, अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भडका उडाल्याची घटना एटापल्ली तालुका मुख्यालयापासून २ किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार संजय सुनिल सिकदर यांच्या घरी त्यांच्या पत्नीने स्वयंपाक आटोपल्यानंतर गॅस बंद केला. दुसऱ्या खोलीत जाताच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आवाज ऐकल्यानंतर संजय सिकदर यांच्या पत्नीने स्वयंपाक खोलीत येऊन पाहताच गॅसची नळी पेट घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजारच्या नागरिकांना बोलावून पेटता गॅस विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र उशीर झाल्याने घरातील सामान व कवेलुचे छत जळाले. यामुळे सिकदर कुटुंबियाचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे.
गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरमध्ये बिघाड असल्यामुळे सदर घटना घडल्याचे नागरिकांना लक्षात आले. या घटनेची माहिती सिकदर कुटुंबियांनी तहसील कार्यालयाला दिली. प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सिकदर कुटुंबियांनी केली आहे. घटनेच्यावेळी सिकदर कुटुंबातील सदस्य घरातच होते. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊन जीवितहानी झाली असती. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे हानी टळली.

Web Title: Cylinder split at Vit Gatta