सिलिंडरची घरपोच सेवा मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:54+5:30

गडचिरोली शहरातील कुटुंबांची संख्या गेल्या दोन ते तीन वर्षात वाढली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गॅस सिलिंडरधारकांची संख्याही दुपटीने वाढली आहे. त्यातच पंतप्रधान उज्ज्वला योजना, वनविभागाची गॅस योजना, यामुळेही गैस वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सद्य:स्थितीत गॅस सिलिंडरची गरज भासते.

Cylinder home service slowed down | सिलिंडरची घरपोच सेवा मंदावली

सिलिंडरची घरपोच सेवा मंदावली

Next
ठळक मुद्देतुटवडा कायम : गॅस सिलिंडर पोहोचण्यासाठी ८ ते १० दिवसांचा विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवाळी सणाच्या पार्वावर घरी लागणाऱ्या सर्व गरजेच्या व संसारपयोगी वस्तूची जुळवणूक बहुतेक नागरिक तसेच गृहिणी दिवाळी १५ दिवस पूर्वीपासून करतात. यामध्ये किराणा, गॅस सिलिंडर व इतर वस्तूंचा समावेश आहे. मात्र गडचिरोली शहरात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने घरपोच सेवा मंदावली असून सिलिंडर घरी पोहोचण्यास विलंब होत आहे.
गडचिरोली शहरातील कुटुंबांची संख्या गेल्या दोन ते तीन वर्षात वाढली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गॅस सिलिंडरधारकांची संख्याही दुपटीने वाढली आहे. त्यातच पंतप्रधान उज्ज्वला योजना, वनविभागाची गॅस योजना, यामुळेही गैस वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला सद्य:स्थितीत गॅस सिलिंडरची गरज भासते. मात्र तुटवडा निर्माण झाला असल्याने गडचिरोली शहरातील सर्वच तिनही गॅस एजन्सीसमोर सकाळी ग्राहकांची रांग लागत असल्याचे दिसून येत आहे.

कंपन्यातील उत्पादन घटल्याचा परिणाम
गडचिरोली शहरात दोन कंपन्यांच्या तीन गॅस एजन्सी आहेत. याशिवाय आरमोरी, चामोर्शी व इतर तालुकास्थळी एजन्सीमार्फत गॅस सिलिंडर सेवा दिली जाते. मात्र या साºयाच ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सिलिंडर निर्मिती कंपन्याचे उत्पादन सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात कमी होत असल्याने हा तुटवडा निर्माण झाल्याचे येथील एका गॅस एजन्सी संचालकाने सांगितले.

Web Title: Cylinder home service slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.