शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संचारबंदीने दुधाचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ते ३० रुपये भाव दूधडेअरीकडून मिळत होता. आता भावात घसरण झाली असून लीटरमागे २१ ते २६ रुपये दिले जात आहे.

ठळक मुद्देपशुपालक अडचणीत : दूधडेअरीकडून लीटर मागे मिळताहेत पाच ते सहा रुपये कमी

अतुल बुराडे।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : कोरोना विषाणूूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. गडचिरोली जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे काही अटींवर सुट मिळाली आहे. मात्र लॉकडाऊनच्या पूर्वी आणि आताच्या परिस्थितीचा विचार केल्यास गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात बदल झाला आहे. कोरोना संचारबंदीमुळे दुधाचे दर पाच ते सहा रुपयांनी उतरले असल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ते ३० रुपये भाव दूधडेअरीकडून मिळत होता. आता भावात घसरण झाली असून लीटरमागे २१ ते २६ रुपये दिले जात आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी गायीच्या दुधाला प्रती लीटर २१ ते २६ रुपये भाव होता. परंतु सध्या प्रती लीटर १७ ते २२ लीटर भाव आहे. सदर दुधाचा भाव हा शासकीय नाही. खासगी दूधडेअरीचा हा भाव आहे. परिसरातील गाई व म्हशींचे दूध खासगी कंपन्या संकलीत करतात. कोरोनाच्या संचारबंदीपूर्वी व आता सुद्धा गाई व म्हशीच्या दुधाचा भाव सारखाच म्हणजे प्रती लीटर ३४ रुपये आहे.ग्रामीण भागात काही शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह गाई, म्हशींच्या उदरनिर्वाहावर चालत असतो. पण ५० पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोना संचारबंदीत बऱ्याच दिवस दुधाचे संकलन डेअरींमार्फत बंद होते. परिणामी पशुपालक शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या. गाई, म्हशींच्या वैरणासाठी चुरी, मका चुरी, सरकी ढेप, चना चुरी व बांधावरील गवताचा उपयोग केला जातो. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी संकरित गाईला पशुखाद्य विकत घेऊन खाण्यासाठी देतात. परंतु कोरोनाच्या संचारबंदीमुळे पशु खाद्याच्या किमती वाढत असल्याचे विसोरा येथील पशुपालक प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे जनावरांसाठी सकस व कमी दरात खाद्य, चारा उपलब्ध करून देणारी नवीन पद्धत निर्माण करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागने सवलतीत वैरण पुरविण्याची आवश्यकता आहे.फॅटच्या दुधात गोलमालदूध घेऊन पशुपालक डेअरीमध्ये आल्यानंतर दुधाचे फॅट काढले जाते. यासाठी डेअरीचालक प्रत्येक उत्पादकाकडून ५० ते १०० मिली दूध घेतो. पण फॅट काढल्यानंतर हे दूध संबंधित शेतकऱ्याच्या मापात परत ओतले जात नाही. फॅटच्या नावाखाली दूधडेअरीचालक दूध स्वत:च्या कॅनमध्ये ओतत असल्याने दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.कुलिंग चॉर्जेसच्या नावाखाली शहरी भागात लूटगडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी तालुका मुख्यालयासह शहरी भागात पॉकेट बंद दूध दररोज येतो. दुधावर २० रुपये छापील किंमत असले तरी बरेच विक्रेते २२ ते २५ रुपये घेतात. १२ रुपयांचा पॉकेट १५ रुपयाला विकल्या जातो. एकूणच कुलिंग चॉर्जेसच्या नावाखाली उन्हाळ्यात शहरी भागात नागरिकांची दुधाच्या व्यवहारात आर्थिक लूट केली जाते. संबंधित शासकीय यंत्रणेने फंटर ग्राहकाच्या माध्यमातून दुधाच्या काळाबाजाराची पोलखोल करून संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :milkदूधcorona virusकोरोना वायरस बातम्या