वेलतुर येथे बहरली शेवगा व चंदन पिकाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:21+5:302021-03-13T05:06:21+5:30

शेतकरी दिगांबर धानोरकर मागील वर्षी २६ जानेवारीला दीड एकर शेतामध्ये चंदन व शेवगा मिश्रशेतीचा प्रयोग केला. यामध्ये २० ...

Cultivation of Bahrali Shevaga and Sandalwood at Veltur | वेलतुर येथे बहरली शेवगा व चंदन पिकाची शेती

वेलतुर येथे बहरली शेवगा व चंदन पिकाची शेती

शेतकरी दिगांबर धानोरकर मागील वर्षी २६ जानेवारीला दीड एकर शेतामध्ये चंदन व शेवगा मिश्रशेतीचा प्रयोग केला. यामध्ये २० बाय १० फूट अंतरावर चंदन तर २० बाय ५ फूट अंतरावर शेवगा पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना एक लाख २० हजार रुपये खर्च आला. या शेतीमधून शेवग्याचे ३ ते ४ टन उत्पन्न निघेल एवढ्या शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. ठोक प्रतिकिलो ४० रुपये भाव मिळतो. यावर्षी १ लाख २० हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. चंदनाच्या झाडाचे २० वर्षांनंतर पाच काेटीचे उत्पन्न मिळू शकते, असा आशावाद या शेतकऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिला.

धान पिकाची शेती करण्यासाठी उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी भाजीपाला, मिरची, रब्बी पीक, मका, आले, हळद आदी पीक घेत आहेत. उत्पादन झालेल्या मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पादन झालेल्या मालाची विक्री गावात, तालुकास्थळी, जिल्हा व बाहेर जिल्ह्यातील मुल येथे केली जाते. लागवडीखालील क्षेत्र पुढील वर्षी वाढविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Cultivation of Bahrali Shevaga and Sandalwood at Veltur