जिल्हाभरात ४.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:32+5:302021-07-23T04:22:32+5:30
आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेत हाेता. मात्र, इतरही पिके शेतकऱ्यांनी घ्यावी, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत ...

जिल्हाभरात ४.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड
आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेत हाेता. मात्र, इतरही पिके शेतकऱ्यांनी घ्यावी, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. लहान शेतकरी शेतीत प्रयाेग करण्याची हिम्मत करत नाही. सधन शेतकरी शेतीत प्रयाेग करू शकतात. गडचिराेली जिल्ह्यातील शेती व वातावरण हळद लागवडीसाठी पाेषक आहे. तसेच या पिकाला अत्यंत कमी प्रमाणात सिंचनाची आवश्यकता राहते. काही नागरिक आता सांधवाडीत ही या पिकाची लागवड करीत आहेत. काही शेतकरी सध्या खाण्यापुरतेच या पिकाची लागवड करीत आहेत. याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. हळदीला बाजारपेठेत चांगला भाव मिळते. किडीचा ही धाेका राहत नाही. व्यावसायिक पद्धतीने या शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज आहे.
यावर्षी कुरखेडा ०.६० हेक्टर, आरमाेरी २.८०, धानाेरा ०.२० व देसाईगंज तालुक्यात १.१० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे.