पत्नीच्या आत्महत्येनंतर सीआरपीएफ जवानानेही संपविले जीवन; स्वत:वर झाडली गाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 21:06 IST2022-03-10T20:50:23+5:302022-03-10T21:06:32+5:30
Gadchiroli News पत्नीने स्वगावी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच धानाेरा येथे कार्यरत सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानाने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली.

पत्नीच्या आत्महत्येनंतर सीआरपीएफ जवानानेही संपविले जीवन; स्वत:वर झाडली गाेळी
गडचिराेली: पत्नीने स्वगावी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच धानाेरा येथे कार्यरत सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानाने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. ही घटना १० मार्च राेजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
चंद्रभूषण ध्यानचंद जगत (२८) रा. कुकुदिरकेरा, जिल्हा-बिलासपूर छत्तीसगड असे आत्महत्या करणाऱ्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. चंद्रभूषण हा २०१७ मध्ये केन्द्रीय राखीव पोलीस दलात भरती झाला होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याची धानोरा येथे बदली झाली होती. त्याअगोदर तो सीआरपीएफ १५० बटालियनमध्ये छत्तीसगडमध्ये कार्यरत होता. विशेष म्हणजे, त्याचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले हाेते. लग्नानंतर पत्नीला स्वगावी ठेवून ताे धानाेरा येथे कर्तव्यावर आला हाेता. मात्र, त्याच्या घरी काैटुंबिक कलह सुरू हाेता. काैटुंबिक कलहातून त्याच्या पत्नीने १० मार्च राेजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही वार्ता चंद्रभूषणला सकाळी ७.३० वाजता कळताच प्रचंड धक्का बसला. त्याने रायफलने स्वत:वरच गाेळी झाडून जीवन संपविले. यात ताे जागीच गतप्राण झाला. अधिक तपास धानाेरा पाेलीस करीत आहेत.