सीआरपीएफने साजरा केला दहशतवादविरोधी दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:17 IST2019-05-21T22:17:16+5:302019-05-21T22:17:33+5:30

सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिरोली येथील कॅम्पमध्ये दहशतवादविरोधी दिन मंगळवारी पाळण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व जवानांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली.

CRPF celebrates anti terrorism day | सीआरपीएफने साजरा केला दहशतवादविरोधी दिन

सीआरपीएफने साजरा केला दहशतवादविरोधी दिन

ठळक मुद्दे१९२ बटालीयनचा कार्यक्रम : अधिकारी व जवानांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या वतीने गडचिरोली येथील कॅम्पमध्ये दहशतवादविरोधी दिन मंगळवारी पाळण्यात आला. याप्रसंगी अधिकारी व जवानांनी दहशतवादविरोधी शपथ घेतली.
सीआरपीएफ बटालीयनच्या कॅम्पमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक (परिचालन) मानसरंजन होते. यावेळी बटालीयनचे कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी कुलदीपसिंह खुराणा, उपकमांडंट कैलास गंगावने, सपन सुमन, वेदपाल सिंह, चिकित्सा अधिकारी डॉ. रविकिरण दिघाडे व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षकांनी जवान व अधिकाऱ्यांना दहशतवाद विरोधी दिनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सर्व जवान व अधिकाऱ्यांना दहशतवादविरोधी शपथ देऊन सर्वांनी दहशतवाद, नक्षलवादाविरोधात समाजात जनजागृती करावी. तसेच असामाजिक तत्त्वाविरोधात कठोर कारवाई करावी, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीआरपीएफ १९२ बटालीयनच्या कर्मचाºयांनी तसेच जवानांनी सहकार्य केले.

Web Title: CRPF celebrates anti terrorism day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.