वनवा लावणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:38+5:30
अधिकारी व कर्मचारी आगीच्या दिशेने गेले असता, त्या ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला. आग कुणी लावली, असे विचारले असता मोहफूल गोळा करण्यासाठी आग मी स्वत: लावल्याचे केशव राऊत यांनी मान्य केले. यावरून वन विभागाच्या पथकाने केशवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वनवा लावणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वन विभागाच्या पथकाने वनवा लावणाºया व्यक्तीस रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना मुडझा-पुलखल परिसरात ११ एप्रिल रोजी दुपारी घडली.
केशव महागू राऊत रा. मुडझा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गडचिरोलीचे वन परिक्षेत्राधिकारी त्यांच्या पथकासह मुडझा-पुलखल भागात गस्त घालत होते. दरम्यान आग लागल्याचे दिसून आले.
अधिकारी व कर्मचारी आगीच्या दिशेने गेले असता, त्या ठिकाणी एक व्यक्ती आढळून आला. आग कुणी लावली, असे विचारले असता मोहफूल गोळा करण्यासाठी आग मी स्वत: लावल्याचे केशव राऊत यांनी मान्य केले. यावरून वन विभागाच्या पथकाने केशवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई वन परिक्षेत्राधिकारी डी. व्ही. कैलुके यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक व्ही. ए. जेनेकर, वनरक्षक व्ही. एस. बुर्रे यांनी केली. जंगलाला लागलेली आग पथकाने त्याचवेळी विझविली.