खासगी फायनान्स कंपनीविरूध्द गुन्हा

By Admin | Updated: January 24, 2015 22:54 IST2015-01-24T22:54:05+5:302015-01-24T22:54:05+5:30

कर्जदाराने कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्याने दिलेले स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प परत न करता ते बँकेत वटवून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी

Crime Against Private Finance Company | खासगी फायनान्स कंपनीविरूध्द गुन्हा

खासगी फायनान्स कंपनीविरूध्द गुन्हा

कर्ज फेडीचे चेक अवैधरीत्या वटविले
गडचिरोली : कर्जदाराने कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्याने दिलेले स्वत:च्या स्वाक्षरीचे कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प परत न करता ते बँकेत वटवून कर्जदाराची फसवणूक केल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी श्रीगणेश पर्चेस फायनान्स कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यांसदर्भात महेश मेनेवार यांनी तक्रारीत म्हटले की, कर्ज घेताना आपण स्वत:च्या बँक खात्याचे स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश व स्वाक्षरी केलेला कोरा स्टम्प तारण म्हणून कंपनीकडे दिला. पुढे आॅगस्ट २०१२ ते आॅक्टोबर २०१३ या कालावधीत आपण कजार्ची पूर्णत: परतफेड केली. परंतु श्रीगणेश हायर पर्चेस फायनान्स कंपनीने तारण ठेवलेले धनादेश व स्टॅम्प परत न करता ते बँकेत सादर करून ३३ हजार रुपयांची उचल करून आपला विश्वासघात केला. अशाचप्रकारे दुचाकी वाहनासाठी कर्ज घेणा-या अन्य चार इसमांचीदेखील ५१ हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यामुळे अहेरी पोलिसांनी श्रीगणेश हायर पर्चेस फायनान्स कंपनीविरूद्ध कलम ४०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा केला आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Crime Against Private Finance Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.