मुलींकडून पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; भासू दिली नाही मुलाची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 19:41 IST2022-02-12T19:41:11+5:302022-02-12T19:41:48+5:30

Gadchiroli News देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव  पेंदोर या ८६ वर्षीय वडीलाच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या.

Cremation of fathers by daughters | मुलींकडून पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; भासू दिली नाही मुलाची उणीव

मुलींकडून पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; भासू दिली नाही मुलाची उणीव

गडचिरोलीः  मुलगा म्हणजे वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे परक्याचे धन, या उक्तीप्रमाणे समाज आजही काहीअंशी वावरत आहे.परंतु या माणसीकतेला आणि परंपरेला छेद देत देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव  पेंदोर या ८६ वर्षीय वडिलांच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या व मयताच्या  तिरडीस खांदा देत हातात आगीचा भांडा, सुप व खांद्यावर कुल्लाडी घेवून अंत्ययात्रेत समाविष्ट झाल्या.
         देसाईगंज शहरातील गांधी वार्डात निवासी बंडू सिडाम व जगदिश कुळसंगे यांचे मयत विठ्ठलराव पेंदोर सासरे होत. ते मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रेणकापुर भातुकली या खेडेगावातील रहिवाशी होते.परंतु नोकरीच्या निमित्ताने ते कुरखेडा येथे स्थायीक झाले. ते शिक्षक होते. या पेंदोर दांपत्यास दोन मुलीच आहेत.दोन्ही मुली शिक्षीका आहेत. त्यांचे पती देखील नोकरीला आहेत. पत्नीचे निधन गत पंधरा वर्षापुर्वीच झाले.त्यामुळे सेवानिवृत्त विठ्ठलराव जावई व मुलींकडेच राहू लागले. अशातच वार्धक्यामुळे त्यांचे निधन मुलींच्या घरीच झाले. जावई,नातवंडे व बराच मोठा आप्तपरीवार देसाईगंज येथे असल्याने त्यांच्या मुलींनी येथेच अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ रोजी मृत्यु झालेल्या पित्याच्या देहाला दुसऱ्या दिवशी वैनगंगा घाटावर त्यांच्या सुनंदा व उषा नामक मुलींनी मुखाग्नी दिला.

Web Title: Cremation of fathers by daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.