नेहरू शाळेत आकाशवाणी केंद्राची निर्मिती

By Admin | Updated: February 24, 2016 01:23 IST2016-02-24T01:23:35+5:302016-02-24T01:23:35+5:30

शहरातील आयएसओ मानांकित असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरने आकाशवाणी केंद्राची निर्मिती केली ...

The creation of Aarva Kendra in Nehru School | नेहरू शाळेत आकाशवाणी केंद्राची निर्मिती

नेहरू शाळेत आकाशवाणी केंद्राची निर्मिती

खासदारांच्या हस्ते उद्घाटन : विद्यार्थ्यांशी साधला संवाद; उपक्रमांचे केले कौतुक
गडचिरोली : शहरातील आयएसओ मानांकित असलेल्या जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरने आकाशवाणी केंद्राची निर्मिती केली असून या केंद्राचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांच्या सोबत न. प. उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, शिक्षण सभापती विजय गोरडवार, केंद्रप्रमुख राधेश्याम भोयर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्या संकल्पनेतून या शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. आकाशवाणी केंद्र हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. खासदारांनी आकाशवाणी केंद्रावरून वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर डिजीटल वर्गास भेट देऊन कार्यप्रणाली जाणून घेतली. ज्ञानरचनावादाचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.
यावेळी खा. अशोक नेते यांनी मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक तंत्रज्ञान व सामग्री खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. इतर शाळांनी नेहरू शाळेच्या उपक्रमांपासून बोध घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांच्यासह शाळेतील शिक्षक महेंद्र शेडमाके, रवींद्र गंदेवार, राजेंद्र पेंदाम, ललीत म्हस्के, सुलभा देवांग, शर्मिला मने, रंजना शेडमाके, पुष्पलता बनकर, प्रियंका रायपुरे, सुनीता भुरसे, मंजूषा तुमराम आदी उपस्थित होते. शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमाचे खासदार व न. प. पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The creation of Aarva Kendra in Nehru School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.