आदर्श प्रात्यक्षिक तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:12 IST2017-12-07T23:12:37+5:302017-12-07T23:12:51+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकरणीय व लाभादायक होईल, असे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयार करावे, ....

आदर्श प्रात्यक्षिक तयार करा
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकरणीय व लाभादायक होईल, असे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयार करावे, शेतकऱ्यांना सदर प्रात्यक्षिकाचे अवलोकन व अभ्यास करता येईल, यासाठी सुविधा उपलब्ध करावी, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डी.एम.मानकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे सोमवारी शास्त्रीय सल्लागार समितीची दहावी सभा पार पडली. या सभेचे उद्घाटन डॉ. डी.एम. मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. पी.व्ही. शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉॅ. व्ही.जे. तांबे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस.बी. अमरशेट्टीवार, कृषी विकास अधिकारी शेरेन पठाण, विषय विशेषतज्ज्ञ डॉ. योगीता सानप, डॉ. व्ही.एस. कदम, पी.ए. बोथीकर, डी.व्ही. ताथोड, ए.एस. तारू, सुनीता थोटे, ज्योती परसुटकर, दीपक चव्हाण, एच.पी. राठोड, जी.पी. मनकर उपस्थित होते.
सभेदरम्यान २०१७-१८ चा प्रगती अहवाल, प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांचा अहवाल, अनुनियोजित चाचणी अहवाल, प्रशिक्षण कार्यक्रम, बिजोत्पादन कार्यक्रम अहवाल व कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या विशेषतज्ज्ञांनी चित्रफितीद्वारे सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. योगीता सानप तर आभार अनिल तारू यांनी मानले. यशस्वीतेसाठी नेशन टेकाम, प्रवीण नामुर्ते, प्रमोद भांडेकर, जितेंद्र कस्तुरे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.