लखमापुर बोरी येथे कोविड लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:08+5:302021-05-12T04:38:08+5:30
गावातील लोकसंख्या भरपूर असल्याने व प्रौढ व्यक्तींना लस घेण्याकरिता बाहेर जाण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी गावातील युवकांनी ग्रा.पं. समितीकडे ...

लखमापुर बोरी येथे कोविड लसीकरण मोहीम
गावातील लोकसंख्या भरपूर असल्याने व प्रौढ व्यक्तींना लस घेण्याकरिता बाहेर जाण्याचा त्रास व वेळ वाचविण्यासाठी गावातील युवकांनी ग्रा.पं. समितीकडे गावातच काेविड लसीकरण करण्याची मागणी केली हाेती. त्यानुसार मंगळवारला भेंडाळा आराेग्य केंद्राची चमू गावात येऊन लसीकरण कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ४५ वर्षावरील लोकांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबने, आरोग्य सहायिका ए. पी. भैसारे, आरोग्य सेविका रजनी दिवे, ज्योती सोमनाते, अरुना बोडावार, रेखा तोडेवार, दर्शना बारसागडे, हसीना सय्यद, अक्षय नैताम आदी उपस्थित होते.
मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ग्रा. पं. सरपंच किरण सुरजागड़े, ग्रामसेवक एस. बी. डोनाळकर, तलाठी ओ. डी. शहारे, पोलिस पाटील एन. कुनघाडकर, उपसरपंच विनोद भोयर, ग्रा. पं. सदस्य भाग्यवान पिपरे, अतुल बारसागडे, अरुण सुरजागडे यांनी सहकार्य केले. ४५ वर्षावरील सर्वांनी न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन डाॅ. साबने यांनी केले. १८० ग्रामस्थांनी लसीकरण करून उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.