शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कापूस व मिरची विक्रीसाठी केंद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 6:00 AM

सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देउत्पादक शेतकऱ्यांची धावपळ : तेलंगण राज्यात न्यावा लागतो शेतमाल

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात धानपिकासोबतच कापूस व मिरची पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. धानविक्रीसाठी शासनाचे आधारभूत खरेदी केंद्र आहेत, मात्र कापूस व मिरचीसाठी असे कोणतेही केंद्र नसल्यामुळे तालुक्यातील कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना पडत्या भावात आपला शेतमाल तेलंगणा राज्यात जाऊन विकावा लागत आहे.सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात कापसाचे पीक घेतले जाते. तेलंगणात अनेक खासगी केंद्र (कापूस जिनिंग मिल) आहेत. कमी अंतरावर हे केंद्र असल्याने तेलंगणातील शेतकऱ्यांना कमी वेळेत कापसाची विक्री करणे सहज शक्य होते. तसेच अपेक्षेनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात एकही केंंद्र नसल्याने येथील शेतकºयांना आपला कापूस दलालांमार्फत तेलंगणाच्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. परिणामी दलाल असणारा इसम आपला कमिशन काढत असल्याने शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने सिरोंचा तालुक्यातही शेतकºयांच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून धान, कापूस, मिरचीसह भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या नवनवीन पद्धती प्रात्यक्षिकासह सांगितल्या जात आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी कापूस, मिरची व धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.महाविकास आघाडी सरकारने व जि.प.च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सिरोंचात कापूस खरेदी केंद्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.६,७२७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडसिरोंचा तालुक्यातील शेतजमीन कापूस पिकाला पोषक असल्याने या तालुक्यात दरवर्षी कापसाचा फेरा वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सिरोंचा तालुक्यात एकूण ६ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. या तालुक्यात प्रती हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल इतक्या कापसाचे उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहेत. तेलंगणामध्ये कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ३०० रुपये भाव दिला जात आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात दलालांमार्फत हाच कापूस तेलंगणात पाठविला जात आहे. स्थानिकस्तरावर दलाल कापसाला क्विंटल मागे ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये शेतकºयांना देत आहे. शेतकºयांची ५०० ते ६०० रुपयांनी कमी भाव मिळत आहे. सिरोंचात आधारभूत केंद्र असते तर शेतकऱ्यांना ५ हजार ५०० रूपयापर्यंत कापसाला भाव मिळाला असता. मात्र आधारभूत केंद्र नसल्याने कापूस उत्पादकांची लूट होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी