शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Coronavirus : कोरोनाला दैवी प्रकोप समजून ग्रामस्थांचे देवीला साकडे, गाऱ्हाण्यासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 7:46 PM

Coronavirus in Maharashtra : सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले.

गडचिरोली - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आणि गावात तापाची साथ सुरू असताना गावकऱ्यांनी देवीला साकडे घालत आरोग्य विभागाच्या तपासणीला नकार दिला. गावकऱ्यांच्या या अनोख्या (अंध)श्रद्धेपुढे आरोग्य विभागाचे पथकही हतबल झाले आहे. हा प्रकार चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर या गावात घडला. (Request to the Goddess in Jairampur to avoid the crisis of Corona, crowd of devotees; Villagers refuse health department inspection)सदर गावात गेल्या आठवडाभरापासून तापाची साथ पसरलेली आहे. गावातील बहुतांश लोकांना ताप आला असल्याने हा दैवी प्रकोप तर नाही ना, या कल्पनेने गावकऱ्यांनी देवीला साकडे घालण्याचे ठरवले. या परिसरातील गावखेड्यात संकटकाळात माउलीला (देवी) पाणी घालण्याची प्रथा आहे.त्यानुसार गावातील महिलांनी नदीवरून कळशीत पाणी भरून वाजतगाजत नेऊन माउलीला अर्पण केले. दोन किंवा पाच दिवस माउलीला पाणी अर्पण केले म्हणजे ताप हा जातो अशी लोकांची समजूत आहे. गावात काही सुशिक्षित नागरिक असले तरी पूर्वीपासून चालत असलेली प्रथा असल्याने कुणीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत नाही. जैरामपूरसह गोंडपिपरी परिसरातही हा प्रकार चालत असल्याची माहिती आहे.सध्या कोरोनाचे रुग्ण अनेक गावात पसरले आहेत. तरीही हा ताप कोरोनाचा नाही अशी गावकऱ्यांची समजूत आहे. हा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर यांनी सांगितले.

आरोग्य विभागाची चमू गावातजैरामपूर गावात तापाची साथ पसरल्यानंतर २७ एप्रिलला आरोग्य कर्मचाऱ्यांनी (आशा) गावात सर्वेक्षण केले. दि. २९ ला ५० लोकांची कोरोना तपासणी केली, त्यात २० जण पॉझिटिव्ह आले. त्यांना शाळेत ठेवून उपचार करण्याची तयार असताना गावकरी ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरातच (गृह विलगीकरणात) ठेवण्यात आले. ३ मे रोजी ४० लोकांची लसीकरण केले. गुरुवारी (दि. ६) गावात पुन्हा कोरोना तपासणीसाठी कॅम्प लावला, पण कोणीही तपासणीसाठी आले नाही. ग्रामस्तरीय समिती, कोनसरी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी वारंवार उद्बोधन करूनही गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण लायबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGadchiroliगडचिरोली