शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus News: पप्पा, लवकर घरी परत या...! लेकीची आर्त साद; १७ दिवसांच्या लढ्यानंतर वडिलांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:06 AM

CoronaVirus News: सीटी स्कोअर १८, ऑक्सिजन ७० असताना १७ दिवसांचा यशस्वी लढा

- महेंद्र रामटेकेआरमोरी : ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या... मी तुमची वाट बघत आहे!’ सर्व परिस्थिती विपरीत दिसत असतानाही मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. आपल्याला जगायचे आहे, निदान कुटुंबासाठी तरी आपण जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी मनाशी केला आणि तब्बल १७ दिवस कोरोनाशी लढा देऊन विजयी मुद्रेने ते घरी परतले.ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. बोरकर यांना सुरुवातीला साधा सर्दी व ताप आला होता. त्यांनी गोळ्या घेऊन प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ब्रह्मपुरी येथे रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेथील खासगी रुग्णालयात भरती झाले. परंतु दुसऱ्या दिवसापासून श्वसनाचा त्रास वाढू लागला. ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली.कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरलडॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी गडचिरोली किंवा नागपूरला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ब्रह्मपुरी येथून बोरकर यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सिटी स्कोअर वाढून १८ वर तर ऑक्सिजन लेवल ७० वर आली होती.  नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली, पण बोरकर यांची स्थिती पाहून डॉक्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला. केवळ कुटुंबीयांच्या इच्छेखातर दवाखान्यात भरती करून घेतलेल्या बोरकर यांनी सकारात्मक विचार आणि मानसिक आधाराच्या जोरावर कोरोनावर मात केली.धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकलेपत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आलाभंडाऱ्यातील डॉक्टरांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतरही बोरकर यांच्या पत्नीने खचून न जाता मोठ्या हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. त्यामुळे उपचार सुरू झाला. ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीत त्यांचा एक-एक दिवस मागे पडत होता. डोळ्यांसमोर मृत्यू बघत होतो, मात्र या परिस्थितीत पत्नीने दिलेली हिंम त, मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली साद, मित्रमंडळींनी दिलेला धीर, विश्वास व आधार यांनी अँटिबॉडीचे काम केले आणि प्रबळ इच्छाशक्ती व आत्मबल जागृत होऊन सकारात्मकपणे जगण्याची नवी उमेद मिळाली. त्यामुळे कोरोनावर विजय मिळवू शकलो, असे देवानंद बोरकर सांगतात.आप्तस्वकियांकडून हिंमत मिळणे गरजेचेऑक्सिजन पातळी खालावलेले अनेक रुग्ण केवळ भीतीने घाबरून मृत्यूच्या दाढेत पोहोचतात. अशा स्थितीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करता येते, याचे उदाहरण म्हणजे ठाणेगाव येथील देवानंद बोरकर ठरले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या