Coronavirus in Gadchiroli; गडचिरोली जिल्ह्याचा मृत्यूदर अत्युच्च पातळीवर, तरीही सक्रिय रुग्ण घटतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 07:01 IST2021-05-05T07:00:20+5:302021-05-05T07:01:01+5:30
Gadchiroli news Coronavirus गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यास आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळातील सर्वाधिक २.०२ एवढा मृत्यूदर मंगळवारी (दि.४) नोंदविला गेला. असे असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे.

Coronavirus in Gadchiroli; गडचिरोली जिल्ह्याचा मृत्यूदर अत्युच्च पातळीवर, तरीही सक्रिय रुग्ण घटतीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यास आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळातील सर्वाधिक २.०२ एवढा मृत्यूदर मंगळवारी (दि.४) नोंदविला गेला. असे असले तरी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही बाब जिल्हावासीयांना थोडी दिलासा देणारी ठरली आहे.
मंगळवारी ५१६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले; पण त्यापेक्षा जास्त म्हणजे ६२७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २३ हजार १२ जणांपैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार २८७ वर पोहोचली आहे. सध्या ४२६० सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मंगळवारी आणखी १७ मृत्यूची नोंद झाली. त्यात ३६ वर्षीय पुरुष रामकृष्णपूर, ता.चामोर्शी, ५१ वर्षीय पुरुष जोगीसाखरा, ता.आरमोरी, ६८ वर्षीय महिला गडचिरोली, ३८ वर्षीय पुरुष ता.अहेरी, ५८ वर्षीय पुरुष ता. ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर, ६१ वर्षीय महिला अहेरी, ६६ वर्षीय महिला वाघाडा, बर्डी ता.आरमोरी, ४० वर्षीय पुरुष उमरी, ता.चामोर्शी, ४८ वर्षीय महिला गडचिरोली, ७५ वर्षीय महिला नवेगाव, गडचिरोली, ५५ वर्षीय पुरुष विवेकानंदनगर गडचिरोली, ७३ वर्षीय पुरुष सर्वोदय वाॅर्ड गडचिरोली, ५३ वर्षीय पुरुष आरमोरी, ७५ वर्षीय पुरुष गडचिरोली, ६५ वर्षीय पुरुष वनश्री कॉलनी नवेगाव, गडचिरोली, ६५ वर्षीय पुरुष कुरूड, ता. देसाईगंज यांचा समावेश आहे.
नवीन ५१६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १७७, अहेरी तालुक्यातील ५८, आरमोरी ३०, भामरागड तालुक्यातील ७, चामोर्शी तालुक्यातील ४२, धानोरा तालुक्यातील २६, एटापल्ली तालुक्यातील ३६, कोरची तालुक्यातील ९, कुरखेडा तालुक्यातील ३१, मुलचेरा तालुक्यातील २२, सिरोंचा तालुक्यातील १९, तर वडसा तालुक्यातील ५९ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ६२७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २२२, अहेरी ६६, आरमोरी ४५, भामरागड १८, चामोर्शी ६१, धानोरा ४, एटापल्ली २६, मुलचेरा १०, सिरोंचा २६, कोरची ३८, कुरखेडा २१, तसेच देसाईगंज येथील ९० जणांचा समावेश आहे.