कोरोनामुक्तीचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:39 IST2021-05-11T04:39:27+5:302021-05-11T04:39:27+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ६१२ वर पोहोचली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१ हजार २९० झाली ...

Coronation liberation accelerated | कोरोनामुक्तीचा वेग वाढला

कोरोनामुक्तीचा वेग वाढला

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ६१२ वर पोहोचली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २१ हजार २९० झाली आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णांचा आकडाही आता झपाट्याने कमी होत आहे. सध्या ३७६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५५७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. साेमवारी १५ नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील ८१ वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील ६३ वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील ३५ वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील ७५ वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील ४३ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ४० वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ता. वडसा जि.गडचिरोली येथील ७५वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील ३६ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ८५ वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील ४० वर्षीय महिला, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील ६० वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१३ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १४.७० टक्के तर मृत्युदर २.१७ टक्के झाला.

नवीन १६७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०४, अहेरी तालुक्यातील ८, आरमोरी ५, चामोर्शी तालुक्यातील २१, धानोरा तालुक्यातील ५, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ८, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ४ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ६ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५५९ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील १८१, अहेरी ४७, आरमोरी ५३, भामरागड ८, चामोर्शी ३८, धानोरा २१, एटापल्ली ३१, मुलचेरा २९, सिरोंचा २७, कोरची २२, कुरखेडा २८ तसेच देसाईगंज येथील ७४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Coronation liberation accelerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.