गडचिरोलीतील आदिवासींना दिला स्थानिक भाषेतून कोरोनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:34 IST2020-04-27T15:34:21+5:302020-04-27T15:34:59+5:30
धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला.

गडचिरोलीतील आदिवासींना दिला स्थानिक भाषेतून कोरोनाचा संदेश
धानोरा तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी जागृती करण्यासाठी येथील पंचायत समितीच्या वतीने जनजागृती अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. धानोरा तालुक्याचा बराचसा भाग छत्तीसगड राज्याला लागून आहे. अनेक गावात छत्तीसगडी भाषा बोलली जाते. ग्रामीण भागात ९५ टक्के आदिवासी आहेत. त्यामुळे स्थानिक भाषेत जागृती केल्यास त्यांना कळेल व प्रशासनाचा उद्देश सफल होईल, ही जाण ठेवून गोंडी, मराठी व छत्तीसगडी भाषेत ऑडिओ क्लिप तयार करुन वाहनाद्वारे ग्रामीण भागात जनजागृती करण्यास शुभारंभ करण्यात आला. जनजागृतीच्या वाहनाला रवाना करताना संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, एम. बी. जुवारे, सी. जी. मडावी, ग्रामसेवक नानाजी धोडरे व कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावात सदर वाहन फिरणार आहे. यादरम्यान नागरिकांना कोरोना विषाणूची माहिती दिली जाईल. तसेच मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, शारीरिक अंतर राखणे आदीविषयी जागृती केली जाणार आहे.