कोरोनाने मृत्यू पावलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:28+5:302021-07-14T04:42:28+5:30
यावेळी मार्गदर्शक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, ...

कोरोनाने मृत्यू पावलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली
यावेळी मार्गदर्शक म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, उपशिक्षणाधिकारी रमेश उचे, अधीक्षक वैभव बारेकर, शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंह गेडाम, वेतन पथक कार्यालयाचे वाळके, गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, सदस्य व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मुख्याध्यापक उपस्थित होते.
सेतू अभ्यासक्रमाची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणे, मानव विकास कार्यक्रमांतर्गतच्या विविध योजना, डीसीपीएस योजना, सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, शालेय पोषण आहार योजना, सर्व शिक्षकांना कोविड-१९चे लसीकरण करणे, शाळांची संच मान्यता, सन २०१९-२० व २०२०-२१ सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षण, चाइल्ड लाइन १०९८ टोल फ्री क्रमांक, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीयदृबल घटक शिष्यवृत्ती योजना, नवोदय परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती योजना आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आढावा घेण्यात आला.