बेफिकीर ग्रामस्थांमुळे वाढतोय कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:43+5:302021-04-28T04:39:43+5:30
नागरिक मास्कविना संचार करताना दिसून येतात. रात्रीला चौकामध्ये गप्पागोष्टींची चांगलीच मैफल रंगली राहते. युवक मोबाइलवर गेम खेळत रात्री १२ ...

बेफिकीर ग्रामस्थांमुळे वाढतोय कोरोना
नागरिक मास्कविना संचार करताना दिसून येतात. रात्रीला चौकामध्ये गप्पागोष्टींची चांगलीच मैफल रंगली राहते. युवक मोबाइलवर गेम खेळत रात्री १२ वाजेपर्यंत एकत्रित येऊन बसून गप्पा मारत असतात. या बेफिकीर युवक व नागरिकांमुळे कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्याचे ग्रामीण भागात चित्र दिसत आहे. कोण कुणाच्या संपर्कात आला असेल, हे सांगणे कठीणच आहे.
ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढू नये, म्हणून कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक स्वतःची जबाबदारी पार पडत आहेत. सामाजिक अंतर पाळावे, बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुऊनच घरामधे प्रवेश करावा, सॅनिटायझर वापर करावा, असे मार्गदर्शन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. ४५ वरील सर्वांनी लस घ्यावी, असेही आवाहन केले जात आहे, पण गावात फिरणाऱ्या बेफिकीर नागरिकांवर वॉच कुणाचा असाही प्रश्न निर्माण झाला आहे. जर बेफिकीर फिरणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवलं नाही, तर रुग्णसंख्या वाढू शकते. शहरातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांवरही कारवाई करण्याची गरज आहे.