लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना टाळणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:41+5:302021-05-03T04:31:41+5:30
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा मुख्यालयी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ...

लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना टाळणे शक्य
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा मुख्यालयी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपादे उपस्थित होते.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला उद्देशून राज्यमंत्री यांनी संदेश दिला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती झाली. कोरोना काळात जिल्ह्यात अनेक प्रकारे आरोग्यविषयक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्यात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात होते.
सध्या या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रुग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. तसेच रुग्णलयातील दंत विभाग, आकस्मिक विभाग, फिजिओथेरपी विभाग, प्रतीक्षालय, औषधी भांडार आणि सुसज्ज वस्त्र धुलाई उभारणीसाठी कामे केली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील प्रमुख व एकमेव संपूर्ण आरोग्य सेवा देणारे माध्यम आहे. या रुग्णालयाचे नूतणीकरण केले जात आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरणही केले जात आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले.
जिल्ह्यात शेतीमध्येही दुबार पीक घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिल्यास जिल्ह्यातील शेती अधिक प्रगतशील होईल. यासाठी धान शेतीबरोबर इतर पीक पध्दती शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. करडई, ज्वारी, अगदी स्ट्रॉबेरी सुद्धा जिल्ह्यात लागवड केली जात आहे.
नक्षलवाद कमी झाला
जिल्ह्यात नक्षलवाद नेहमीच विकासाच्या आड येताना आपण पाहत आहे; परंतु आता जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हे वर्ष गडचिरोली
पोलीस दलासाठी महत्त्वाचे व यशस्वी वर्ष ठरले आहे. ग्रामपंचायत निवडणुका अतिशय शांततेत पहिल्यांदाच पार पाडल्या गेल्या. यावर्षी चकमकीत ७ नक्षली मारले गेले, ४ जणांना अटक केली तर ४ जणांनी आत्मसमर्पण केले. अशाप्रकारे विविध विकासात्मक कामातून, पोलीस प्रशासनाच्या लढ्यातून, जिल्हा प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनातून महाराष्ट्र राज्यातील हिरवाई असलेला गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण, रुग्णांवरील उपचार, औषधांचा पुरवठा व ऑक्सिजनपुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ. सोळंकी, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ.बागराज दुर्वे उपस्थित होते.