बेरोजगारांचा तहसीलदारांना घेराव
By Admin | Updated: September 13, 2014 01:35 IST2014-09-13T01:35:14+5:302014-09-13T01:35:14+5:30
मुरूम, विटाच्या परवान्यासाठी तहसील कार्यालयात सादर केलेले अर्ज तत्काळ निकाली काढावे व सुशिक्षित बेरोजगारांच्या ....

बेरोजगारांचा तहसीलदारांना घेराव
देसाईगंज : मुरूम, विटाच्या परवान्यासाठी तहसील कार्यालयात सादर केलेले अर्ज तत्काळ निकाली काढावे व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्यावा या मागण्यांसाठी सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्यावतीने देसाईगंजच्या तहसीलदारांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला.
भाकपाचे जिल्हासचिव डॉ. महेश कोपुलवार यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील शेकडो सुशिक्षीत बेरोजगार संघटित झाले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. दरम्यान तहसीलदारांना सुशिक्षित बेरोजगार हक्क संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शहरात सध्या बांधकामे वाढली आहेत. यामुळे या बांधकामासाठी साहित्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे विटा, मुरूम साहित्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना परवाने देणे आवश्यक आहेत. मात्र स्थानिक तहसील कार्यालयामार्फत गेल्या काही दिवसांपासून परवाने देणे बंद झाले आहेत. परिणामी शहरातील विटा व मुरूम साहित्याचा पुरवठा करणारे सुशिक्षीत बेरोजगाराच्या हाताला काम नाही. यामुळे नाइलाजाने अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करावे लागते, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी ईलीयास खान, बेरोजगार हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बालूगिरी, किशोर चौधरी, हरिष डांगे, बादलशहा, आशीफ शेख, श्रवण बुल्ले, खालीद कुरेशी, उमेश देवढगले, उल्हास पत्रे, सोनू पठाण, राहूल राऊत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)